उत्तराखंडला सौम्य भूकंपाचा धक्का

डेहराडून, दि.27 – महापूरामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या उत्तराखंडमध्ये युध्दपातळीवर मदतकार्य सुरु असतानाच, उत्तराखंडला सौम्य भूकंपाचा धक्का बसला आहे. उत्तराखंडमधील पिथोरगड येथे 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

या भूकंपामुळे मदतकार्य बाधित झाले आहे का किंवा कुठे जिवीत आणि वित्तहानी झाली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. राज्यात क्षणक्षणाला बदलणा-या हवामानामुळे बचावकार्यात मोठया प्रमाणावर अडथळे येत आहेत. पुरग्रस्त भागात अजूनही हजारो यात्रेकरुन ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
खराब हवामानामुळे मंगळवारी वायूदलाच्या एका हॅलिकॉप्टरला अपघात झाला होता. ज्यात लष्कर आणि अन्य पथकांच्या आठ जवानांसह 20 जाणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment