गौरीकुंड, दि.26 – महापूरात अडकलेल्या पर्यटक, भाविकांना वाचवण्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात शहीद झालेल्या 20 अधिकारी – जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश आहे. हे जवान महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील हे रहिवाशी होते. या दोन्ही जवानांचे शव आज (बुधवार) दुपारपर्यंत त्यांच्या घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.
काल झालेल्या या हेलिकॉप्टर दुर्घटनेत धुळ्याचे कॅप्टन शशिकांत पवार तर जळगावचे गणेश अहिरराव या दोघेही शहीद झाले होते. तर या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या 20 एवढी आहे. महाराष्ट्रातील हे दोन्ही जवान उत्तराखंडच्या पिडीतांसाठीच्या बचाव कार्यात मदत करत होते. केदारनाथवरुन परतताना या हेलिकॉप्टरचा गौरीकुंड येथे अपघात झाला. या हॅलिकॉप्टरमध्ये केदारनाथ येथे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम संस्कारासाठी लागणारे आवश्यक ते सामान होते. खराब हवामान तसेच हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात मृत झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले होते. तसेच आज मुख्यमंत्री बहूगूणा यांच्याकडून त्यांच्या या दुर्घटनेत मृत झालेल्या जवानांच्या नातेवाईकांना 10 कोटी तर गुजरातचे मुख्यमंत्री
नरेंद्र मोदी यांनी 5 कोटी मोबदला जाहीर केला होता. कॅप्टन शशिकांत आणि कॅप्टन गणेश अहिरराव या दोघांचे शव दुपारपर्यंत त्यांच्या गावात पाठवण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
उत्तराखंडमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात ठार झालेल्यांची संख्या 20 वर गेलीये. हेलिकॉफ्टरमध्ये शहीद झालेल्यांमध्ये हवाई दलाच्या पाच, एनडीआरफच्या नऊ आणि आयटीबीपीच्या सहा जवानांचा समावेश आहे. शहिदांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी हवादलप्रमुख एअर चीफ मार्शल एनएके
ब्राउनी हे गौरीकुंडला रवाना झालेत. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडलाय. तो तपासणीसाठी चंदिगडला पाठवण्यात येतोय. त्यानंतर अपघाताचं कारण समजू शकेल. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एमआय-17 जातीचं होतं, ते गौरीकुंडजवळ कोसळलं होतं. त्यात हवाई दल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी (खढइझ) आणि नॅशल डिझास्टर रेस्क्यू फोर्स म्हणजेच एनडीआरए (छऊठऋ) चे जवान होते. गौचरहून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं आणि ते गौरीकुंडच्या दिशेनं जात होतं. ते का कोसळलं याचं कारण अजूनही समजलेलं नाहीय. पण ते दाट धुक्यांमुळे कोसळलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.