पठाण ऐवजी मोहम्मद शमीला संधी

मुंबई: आगामी काळात होत असलेल्या वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघात मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मांडीच्या दुखापतीमुळे इरफान त्रस्ता झाला आहे. इरफानला दुखापत झाल्याने, त्याच्या जागी शमीची निवड करण्यात आली आहे. शमीने यंदा पाकिस्तानविरुद्ध मालिकेत पदार्पणात चांगली कामगिरी केली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघात इरफानचा समावेश होता. मात्र मांडीच्या दुखापतीमुळे इरफान आता भारतात परतणार आहे. बंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये तो दुखापतीवर उपचार घेणार असल्यारची माहिती सुत्रांनी दिली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इरफानला फक्त सराव सामन्यातच संधी मिळाली होती. श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात इरफाननं पाच षटकांत ४५ धावा मोजल्या होत्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

मोहम्मद शमीने यंदा पाकिस्तानविरुद्ध मालिकेत पदार्पणातच दमदार कागिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. होती. वन डे कारकीर्दीत शमीच्या नावावर पाच सामन्यांत मिळून १७४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स जमा आहेत. आता या मिळालेल्याव संधीचा शमी कितपत फायदा घेतो याकडे सर्वांचे लक्श लागले आहे.

Leave a Comment