देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यात होण्याची शक्यता

पुणे दि.२६- देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात उभारण्याच्या हालचालींनी वेग घेतला असल्याचे राज्याचे क्रीडा सचिव वाय.एस श्रीया यांनी सांगितले. ते म्हणाले नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील पहिले वहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यात आकार घेईल अशी आमची खात्री आहे.

परदेशी प्रशिक्षक तसेच भारताचे टॉप अथलेट यांची या क्रीडा विद्यापीठ उभारणीत महत्त्वाची भूमिका असेल असेही समजते. अशा क्रीडा विद्यापीठासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला असून राज्य शासन त्यादृष्टीने ठाणे अथवा बालेवाडी असे दोन पर्याय तपासून पाहते आहे. बालेवाडी क्रीडा संकुलाची जागा अशा विद्यापीठासाठी आदर्श आहे कारण येथे स्टेडिअम. हॉस्टेल व अन्य सुविधा उपलब्ध आहेतच. पुण्यातच हे विद्यापीठ उभारले जावे यासाठी संबंधितांशी सतत संपर्क साधला जात असल्याचेही सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी पुण्यातील क्रीडा विद्यापीठासाठी कांही कार्पोरेट व प्रमोटर्सकडून प्रस्ताव आल्याचे सांगितले. पुणे जिल्हा बॅडमिटन असो.चे अध्यक्ष अनिरूद्ध देशपांडे म्हणाले की यूएस व युरोपच्या पॅटर्नप्रमाणे हे विद्यापीठ उभारले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे विद्यापीठ अस्तित्वात आले तर देशातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि देशाचे क्रीडा क्षेत्रातील भविष्यही उज्वल बनेल.

Leave a Comment