नवी दिल्ली दि. २६ – सोनीने त्यांचा आणखी एक स्मार्टफोन एक्स्पेरिया झेड अल्टा नावाने बाजारात आणला आहे. हा जगातील बाजारात असलेल्या सर्व स्मार्टफोनमध्ये हा सर्वात स्लीम तसेच ६.४ इंचाचा सर्वात मोठा एचडी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.
सोनीच्या यापूर्वीच सादर करण्यात आलेल्या एक्स्पेरिया झेड प्रमाणेच हा अल्टा झेडही वॉटरप्रूफ आणि धूळ प्रतिबंधक आहे. विशेष म्हणजे अर्धा तास पाच फूट पाण्यात हा फोन राहिला तरी त्याला कांहीही नुकसान पोहोचत नाही. २०१३ च्या तिसर्या तिमाहीत हा स्मार्टफोन सर्व जगभर सादर केला जाणार आहे. या फोनला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, व्हिडीओ रेकॉर्डिगंची सुविधा, १६ जीबी स्टोरेज आणि कायक्रो एसडीच्या सहाय्याने ६४ जीबी स्टोरेज अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत.