राज ठाकरे, अजित पवार यांच्या विरोधातील याचिका मागे

मुंबई – दोन महिन्यापुर्वी राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या वक्तव्यावरून राज्यात पडसाद उमटले होते. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामध्ये तोडफोड झाली होती. या तोडफोडीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. याविरोधात पुण्यातील राष्ट्रीय भ्रष्ट्राचारविरोधी जनशक्तीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज आणि पवारांविरोधात एक जनहित याचिका दाखल केली होती. ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेतली आहे.

खंडपीठासमोर मंगळवारी ही याचिका सुनावण्यासाठी आली. त्यावेळी याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी काही तांत्रिक त्रुटींमुळे याचिकेत दुरूस्ती करावयाची आहे, हे कारण दिले. खंडपीठाने ही जनहित याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर पाटील यांनी आपली याचिका मागे घेतली.

जलसिंचनाच्या मुद्द्यावरू राज ठाकरे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले होते. त्यानंतर नाशिक दौ-याच्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले होते. दोन्ही पक्षांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसानही झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय भ्रष्ट्राचारविरोधी जनशक्तीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज आणि पवारांविरोधात एक जनहित याचिका दाखल केली होती.

Leave a Comment