सैफ, रितेश करणार आता तिहेरी रोल

आगामी काळात दिग़दर्शक साजीद खानचा ‘ हमशकल’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमासाठी त्यांंनी कलाकार फायनल केले आहेत. ‘ हमशकल’ हा सिनेमा विनोदी सिनेमा असणार आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान आणि रितेश देशमुख हे तिहेरी भूमिका करताना दिसणार आहेत.

यापूर्वी अभिनेता सैफ अली खानने गो गोवा गोन या सिनेमामध्ये झोम्बी किलरची विनोदी भूमिका केली होती. त्याोनंतर आता सैफ हा विनोदी चित्रपट करणार असल्यामचे समजते. त्याकसोबत अभिनेता रितेश देशमुख सुध्दात ब-याच दिवसानंतर विनोदी सिनेमा करणार आहे. त्यांच्या शिवाय या सिनेमात छोटया पडद़यावरील कलाकार राम कपूर हा देखील या सैफ व रितेशसोबतच तिहेरी भूमिका करणार आहे.

फॉक्स स्टार स्टुडिओ आणि पूजा एन्टरटेनमेंटच्या हमशकल’ या सिनेमाचे वाशू भगनानी हे निर्माता आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच विदेशात सुरू होणार आहे. ‘हमशकल’ हा सिनेमा पुढील वर्षी ६ जूनला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची उत्सुगकता आतापासूनच सर्वांना लागून राहिली आहे.

Leave a Comment