विद्याला करायचय इमरान सोबत काम

‘डर्टी पिक्चर’ नंतर बॉलीवुड अभिनेत्री विद्या बालन आणी इमरान हाशमी हे आगामी काळात येत असलेल्या ‘घनचक्कर’ या सिंनेमात पुन्हा एकत्रित दिसणार आहेत. विद्याने आतापर्यंत दोन सिनेमात इमारन सोबत काम केले आहे. त्यामुळे आगामी काळात देखील विद्याला आणखी इमरानसोबत काम करायची इच्छा आहे.

याबाबत अधिक बोलाताना विद्या म्हणाली, ‘डर्टी पिक्चर’ च्या यशानंतर मला लगेचच सिनेमा मिळेल असे वाटले नाही. मात्र मला लगेचच पुन्हान एकदा ‘घनचक्कर’ या सिनेमातून इमरान सोबत काम करण्या ची संधी मिळाली. त्याच्या सोबत काम करण्याचा अनुभव एकंदरीत रोमांचक असा आहे. या सिनेमातील आमची जोडी ब-याच जणांना आवडली आहे. त्या़मुळे आगामी काळात आम्हाणला पुन्हा एकदा एकत्रित काम करण्याची संधी मिळेल असे वाटते.

आगमी काळात येत असलेला ‘घनचक्कर’ हा सिनेमा थोडासा वेगळा आहे. या सिनेमात इमरान वेगळया स्व रुपाची भूमिका करीत आहे. इमरान सोबत ‘घनचक्कर’ या सिनेमात काम करताना खूप मजा आली. या सिनेमातील क्रेजी भुमिकाने इमरानने सर्वांना बदलून टाकले आहे. ‘घनचक्कर’ हा सिनेमा येत्यार २८ जून रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment