दि.3 ते 7 जुलैदरम्यान बालेवाडीयेथे 20वी आशियायी अ‍ॅथॅलिटिक्स स्पर्धा

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) – पुढील आठवड्यात पुण्यात बालेवाडीयेथे पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरत आहेत. आशियाई अ‍ॅथलेटिक्सची 20 वी स्पर्धा बालेवाडी येथे 3 ते 7 जुलै या कालावधीत होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी दिली.
स्पर्धेच्या तयारीची आढावा बैठक

दि.3 ते 7 जुलैदरम्यान बालेवाडीयेथे 20वी आशियायी अ‍ॅथॅलिटिक्स स्पर्धा क्रीडामंत्री वळवी यांनी आज घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. यावेळी अप्पर मु‘य सचिव जे. एस. सहारिया, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्य अथलेटिक्स स्टेडियममधील रंगरंगोटी, ट्रकचे किरकोळ दुरुस्तीचे काम आणि क्रीडा साहित्याची उपलब्धता, तांत्रिक कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच वसतिगृहाचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेले असून, उर्वरित कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. त्याचप्रमाणे काही आवश्यक साहित्याचे पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वळवी यांनी सांगितले.

बालेवाडीत 1 जुलै रोजी सर्व खेळांडूनचे आगमन होणार असून, भारतीय संघ दि.29 जून रोजी दाखल होणार आहे. खेळांडूच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तांत्रिक व इतर आवश्यक सेवांसाठी स्वयंसेवकाची नियु्क्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या संघात 10 खेळांडू असून, त्यातील 6 खेळाडू पुण्यातील आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि. 2 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या होणार आहे. तर समारोप 7 जुलै रोजी सायंकाळी होणार आहे. स्पर्धेच्या दरम्यान वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धा व्यवस्थित पार पडतील, असा विश्‍वास वळवी यांनी व्य्नत केला आहे.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे : देशमुख
आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुण्यात होणार आहे. स्पर्धेत 45 देशातील 400 हून अधिक खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी बहुसं‘य शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात येईल. विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीयाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment