सलमान खानला होऊ शकतो तुरुंगवास!

मुंबई, दि.24 – 28 सप्टेंबर 2002 रोजी म्हणजेच सुमारे 11 वर्षांपूर्वी सलमानच्या कारने धडक दिल्याने एकाचा मृत्यू आणि 5 कामगार जखमी झाले होते. या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सलमान खानला 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात सलमानने सेशन कोर्टात अपील केले होते. आपल्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतून मुक्त करण्यात यावे, असे अपील सलमान खानने केले होते. मात्र हे अपील फेटाळून लावल्यामुळे सलमान खानच्या अडचणींमध्ये वाढ आहे.

28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानच्या कारने धडक दिल्याने एकाचा मृत्यू आणि 5 कामगार जखमी झाले होते. या प्रकरणी सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदावण्यात येणार आहे.

Leave a Comment