पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण करावे – सोनिया

किश्तवाड, दि.25 – उत्तराखंडमध्ये आलेले नैसर्गिक स्नकट लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पर्यावरण आणि जैवविविधता या विषयांना विशेष महत्त्व दिले. जम्मू काश्मीरजवळील जिल्ह्यात 850 मेगावॉटचा विद्यूत प्रकल्पाची पायाभरणी आज त्यान्च्या हस्ते होत असताना त्या म्हणाल्या, मला असे वाटते की, पर्यावरण आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या रॅटल विद्यूत प्रकल्पाचा स्थानिक लोकांना मोठा फायदा होईल,’ असे ही त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी ज्या लोकांची जमीन घेण्यात आलेली आहे त्यांना त्या जमीनीचा चांगला मोबदला देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

काल झालेल्या जम्मू-काश्मिर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आठ जवानांच्या मृत्यूवर सोनीयांनी दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, जम्मू-काश्मिरच्या जनतेने राज्याला शांती, प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी उत्कृष्ट योगदान दिले आहे. राज्यात यु.पी.एस.सी’ परिक्षेत उत्तीर्ण होण्याच्या वाढत्या प्रमाणावर सोनियांनी आनंद व्यक्त केला आहे. सोनिया म्हणाल्या, की तरुणांनी हे दाखवून दिले आहे, की त्यांना संधी दिली तर ते सर्वच स्तरावर यापेक्षाही
चांगले कार्य करतील.’ राज्यातील विकास तसेच रोजगारच्या वाढीसाठी केंद्राकडून अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बाबत माहिती देताना सोनिया यान्नी सान्गितले की, केंद्राने राज्यातील तरुणांच्या कौशल्य विकासास प्रोत्साहन देण्यासाठी उडान’ आणि हिमायत’ योजना सुरु केल्या आहेत.’ पुढे त्या म्हणाल्या, की नुकतेच मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला आणि राहूल गांधी यांनी राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उम्मीद’ या योजनेची सुरुवात केली आहे.’ तसेच जम्मू काश्मिर सरकारने राज्याच्या अनेक भागांना जोडण्यासाठी काही विशेष पाऊले उचलली आहेत असे ही त्यांनी सांगितले. राज्यातील उत्कृष्ट नेतृत्वासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले आहे. आझाद हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.

Leave a Comment