
काबूल दि.२५ – अफगाणी प्रेसिडेंटच्या पॅलेसवर हल्ला चढविणार्या सर्व दहशतवादी तालिबान्यांना ठार करण्यात आले असल्याचे काबूलचे पोलिस प्रमुख जनरल अयूब यांनी जाहीर केले आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अफगाण प्रेसिडेंटच्या पॅलेसवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. सकाळपासूनच किमान दहा स्फोटांचे आवाज या परिसरात आले असून गोळीबाराच्या फैरी सतत झडत होत्या. अफगाणचे प्रेसिडेंट हमीद करझाई यांच्यासंबंधी कोणतीच बातमी अद्याप दिली गेली नाही मात्र सकाळी ते महालाबाहेर पत्रकाराना भेटणार होते. त्यामुळे या ठिकाणी पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.