कॅटरीना बनणार दिग्दर्शक

बॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारया कॅटरीना कैफच्या करिअरमध्ये लवकरच नवा ट्विस्ट येणार आहे. अभिनयापाठोपाठ आता कॅटरीनाने चित्रपट दिग्दर्शक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. हाच तिच्या करिअरमधील नवा ट्विस्ट ठरणार आहे.

बार्बी डॉल कॅटरीनाचे नाव बॉलीवुडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणले जाते. अर्थातच अथक परिश्रम आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावरच तिने यश मिळवले असून तिच्या अनेक सिनेमांनी १०० कोटींची कमाई केली आहे. अभिनयात आपली छाप पडल्यानंतर कॅटरीनाने आता दिग्दर्शक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज पर्यंत मोठ्या पडद्यावर जे काही करता आले नाही ते तिला दिग्दर्शक बनून करायच आहे. सध्या ती चित्रपट प्रोड्यूस करण्यासाठी एका चांगल्या कथेच्या शोधत आहेत.

दरम्यान यावर्षी ”धूम-३” आणि “बँग-बँग” हे दोन चित्रपट प्रदर्शित होत असल्याने डिसेंबर २०१३ पर्यंत तिच्याकडे अजिबात वेळ नाही. मात्र हे चित्रपट प्रदर्शित झाले की, ती याकडे लक्ष देणार आहे. अभिनेत्री म्हणून कॅटरीनाला खूप प्रसिद्धी आणि यश मिळाल आता ती यशस्वी दिग्दर्शक बनते का ?
हे लवकरच कळेल.

Leave a Comment