‘फ्लाईंग सिख’ अर्थात धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ’भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून, फरहान अख्तर मिल्खा सिंगच्या भूमिकेत आहे.
‘भाग मिल्खा भाग’ ला पाकमध्ये बंदी
१९४७ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान फाळणी दरम्यान मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे मिल्खा सिंग पाकिस्तानला जाण्यास नकार देतात, हा यामागील संदर्भ आहे. यावर आक्षेप घेत पाकिस्तान सेन्सर बोर्डाने चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली आहे. पाकिस्ताने बंदी घातल्याने या चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. आता याचा चित्रपटाला किती फायदा होतोय ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.