आगामी काळात जोया अख्तर भाउ बहिणीच्या कथेवर आधारित सिनेमाची निमिर्ती करीत आहे. त्या रोलसाठी गेल्या काही दिवसांपासून तो अभिनेत्याचा विचार करीत आहे. त्यासाठी त्या़ने प्रियंका चोप्रा व रणवीर सिंहची निवड केली असल्याचे समजते.

जोयाने यासाठी रियल लाईफ मध्ये भाउ- बहिण असलेले रणबीर कपूर आणि करीना कपूर या दोघांना घेण्याचे ठरविले होते. दोघेपण या सिनेमात काम करण्यास तयार होते. मात्र अचानक त्यांना दुसरे काम मिळाल्याने त्यांनी कामास नकार दर्शविला आहे. पहिल्यांदा रणबीरने नकार दर्शविला त्यानतर करीनाने पण हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला.
आता या रोलसाठी रणवीर सिंह आणि प्रियंका चोप्रा यांची निवड केली आहे. हे दोघेही कलाकार आता भाउ-बहिणीचा रोल करणार आहेत. यापूर्वी ‘गुंडे’ या सिनेमात दोघांनी हीरो-हीरोइनचा रोल केला आहे. त्यांनतर आता लगेचच दोघेपण बहीण -भावाचा रोल करणार असल्याने हा रोल सर्वांना आवडणार की नाही याची उत्सुसकता सर्वांना लागली आहे.