महाराष्ट्रातील नम्बर 1 वरील मनोरंजनपर ब्रँड असलेल्या स्टार प्रवाहने ताज्यातवान्या आणि खास आशयासह दर्शकांची मने काबीज केली आहेत. या ब्रँडने दर्शकांच्या मनावर तसेच टीआरपी तालिकेवरही अधिराज्य गाजवले आहे. असच टिआरपी मिळ्वण्यासाठी स्व्प्नान्च्या पलीकडेमध्ये इन्स्पेक्टर अर्जुन म्हणून अजिंक्य देवचे आगमन होणार आहे. त्याला 25 जून 2013 पासून मालिकेत पाहता येणार आहे. अर्जुन अतिशय रांगडा आणि खंबीर पोलिस अधिकारी आहे. तो समोर येताच गुन्हेगार भीतीने चळाचळा कापतात. तो मोजकेच बोलतो. तो बडबड करण्यापेक्षा कृती करण्यावर भर देतो.
पाटकर कुटुंबात अजिंक्य देवचे आगमन
श्रेयस आणि वैदेहीच्या आयुष्यात अनेक वादळे येऊन गेली आहे पण त्यातून ती दोघे एकमेकांच्या साथीने आणि कुटुंबाचे पाठबळ घेऊन खंबीरपणे सावरली आहेत. अनिकेतचे पाटकर कुटुंबात आगमन झाल्यावर पाटकर कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, श्रेयसला तुरुंगात जावे लागते. श्रेयसला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याकरिता वैदेही शर्थीचे प्रयत्न करत असताना तिची भेट इन्स्पेटक्टर अर्जुनशी होते. सुरुवातीला तिला मदत करण्यात रस नसणारा अर्जुन वैदेहीने तिडीकीने चार शब्द सुनावल्यावर तिची मदत करायचे ठरवतो. ज्या प्रकरणाबद्दल श्रेयसला अटक झाली आहे ते प्रकरण अखेरीस इन्स्पेटक्टर अर्जुनकडे येते. अर्जुन या प्रकरणाचा छडा लावू शकेल का? या प्रकरणातील खरा गुन्हेगार प्रकाशात आणण्यात त्याला यश येईल का?