जात प्रमाणपत्र नसले तरी इंजिनिअलिंग प्रवेश सुरु

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात तीन महिन्यांच्या आत सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश घेते वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून अभियांत्रिकीला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापासून जागावाटप झाल्यानंतर प्रवेश घेते वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचीमोठी धावपळ उडाली. ऐन प्रवेशप्रक्रियेच्या वेळी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांनामोठी कसरत करावी लागते. त्यात जात वैधता प्रमाणपत्र मिळू न शकणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशालामुकावे लागण्याची श्‍नयता होती.

बहुतांश विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे हे प्रमाणपत्र मिळू शकत नाही. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे न्यायालयीन वाद निर्माण होण्याच्या श्‍नयतेने दरवर्षी तीनमहिन्याच्या आत प्रमाणपत्र सादर करण्याची सवलत तंत्रशिक्षण विभागाने बंद केली होती. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्र अजूनही न मिळाल्याने गेल्या वर्षीची सवलत पुन्हा सुरू करावी, अशी पालकांचीमागणी होती. त्या पार्श्‍वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनायाकडून यंदाही ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रवेश घेताना ज्या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल, त्यांनी हे प्रमाणपत्र तीनमहिन्यांच्या आत प्रवेश मिळालेल्यामहाविद्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. याबाबतचे हमीपत्र 100 रुपयांच्या स्टँप पेपरवरमहाविद्यालयात सादर करावयाचे आहे. या हमीपत्राचीमाहिती संचालयानाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या हमीपत्राच्या आधारे विद्यार्थी राखीव प्रवर्गासाठी प्रवेशास पात्र राहतील, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने कळविले आहे.
——–

Leave a Comment