शाहरुख प्रकरणी हॉस्पिटलची नोटीस

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने तिस-यांदा पिता होण्यासाठी सरोगसी तंत्राचा वापर करताना लिंगनिदान चाचणी बंदी कायद्याचा भंग केल्याचा आरोप होत आहे. साता-याच्या वर्षा देशपांडे यांच्या तक्रारीतील चुकीच्या आरोपांमुळे बदनामी झाल्याची नोटीस जसलोक हॉस्पिटलने देशपांडे यांना पाठविली आहे . देशपांडे यांनी बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा करून ज्या आधारावर ते केले आहेत , ते पुरावे सादर करण्याची मागणी नोटिशीत केली आहे. दरम्यान चौकशीत कोणताही पुरावा आढळला नसल्याची ‘ क्लीन चीट ‘ पालिका प्रशासनाने शाहरुखला दिली आहे .

काही दिवसापुर्वि जसलोक हॉस्पिटलच्या डॉ. फिरुझा पारीख यांनी देशपांडे यांना फोनवर बोलताना हॉस्पिटलचा सरोगसी उपचार व लिंग निदान चाचणीशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला होता, असे असताना अॅड . देशपांडे यांनी त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. डॉ . फिरुझा पारीख या आयव्हीएफ क्षेत्रातील नामवंत डॉक्टर असून त्या १९८९ पासून जसलोकमध्ये काम करीत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे आदराचे स्थान असल्याचेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. हॉस्पिटलतर्फे अड . माधवी देशपांडे यांनी ही नोटीस दिली आहे .

शाहरुख खान यांनी सरोगसी माध्यमातून तिस-या अपत्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात अपत्याची लिंगचाचणी केल्याने तो लिंगनिदान चाचणी बंदी कायद्याने गुन्हा असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले होते.

Leave a Comment