महाराष्ट्राच्या पर्यटनाचे आंध्रात मार्केटिंग

mtdc
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळांचे मार्केटिंग करण्याची आक्रमक योजना आखली आहे. या साठी आंध्र प्रदेश सरकारशी करार केला असून हे पर्यटन आंध्राच्या काही निवडक शहरांत केले जाणार आहे. आंध्रात हा कार्यक्रम सुरू होईल आणि नंतर देशाच्या अन्य शहरांतही अशीच मोहीम आखली जाईल अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. देशातली १० मुख्य शहरे त्या साठी निश्‍चित करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशाच्या राजधानीत हैदराबादेत बेगमपेट भागात असलेल्या आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय काढण्यात येईल|

या कार्यालयातून आंध्रातून महाराष्ट्रात येणार्‍या पर्यटकांनी महाराष्ट्राची माहिती देऊन त्यांना महाराष्ट्रातल्या भ्रमंतीसाठी मार्गदर्शन करणे हे या कार्यालयाचे काम असेल. आंध्र प्रदेश हे विकसित राज्य असून तिथे पर्यटनाला बाहेर पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा लोकांना बघावे अशी अनेक ठिकाणे या लोकांना माहीत नाहीत पण महाराष्ट्रात अगदी दुर्मिळ अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. ही स्थळे बघण्यासाठी आपण आंध्रातल्या लोकांना पाचारण केले पाहिजे आणि प्रोत्साहित केले पाहिजे असे श्री. भुजबळ म्हणाले.

महामंडळाने महाराष्ट्राची पर्यटन विषयक माहिती देणारी एक ध्वनिचित्रफीत तयार केली असून ती देशभर वितरित करण्याचा महामंडळाचा विचार आहे. अजिंठा – वेरूळची लेणी, ७०० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, ताडोबा सारखी अभयारण्ये ही आकर्षणे महाराष्ट्रात आहेत. महाबळेश्‍वर, शिर्डी, पांचगणी अशीही अनेक आकर्षणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एक कार्यालय दिल्लीत आहे. आता होत असलेले हैदराबादेतले कार्यालय दुसर्‍या क्रमांकाचे असून अशी दहा कार्यालय राज्या बाहेर काढली जाणार आहेत.

Leave a Comment