डॉ सतीश देसाई यांचे समारोपाचे भाषण न करण्याचे ‘नाट्य’

पुणे, दि. 23 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेची अखेरची बैठक वादळी चर्चा होवून रविवारी आगामी निवडणुकीची नांदी ठरली. कार्यकारीणीची शेवटची बैठक असल्याने अध्यक्ष डॉ. सतिश देसाई काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र डॉक्टरांनी आरोपांना उत्तर देणे तर दुर आपल्या कारकिर्दीबद्दली अवाक्षर न उच्चारल्याने कार्यकारिणीला नाट्यमय समारोप मिळाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या 2008 ते 2013 कालावधी पूर्ण झाला. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी कार्यकारिणीची शेवटची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष डॉ. सतिश देसाई, प्रमुख कार्यवाह सुरेश देशमुख, कोषाध्यक्ष दिपक रेगे यांच्यासह 76 अजिव सभासद या बैहकीला उपस्थित होते.

नाट्य परिषदेच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम येत्या आठवडयात जाहीर होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ते निवडणुकीचा निकाल या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नवीन कार्यकारिणी तीन महिन्याच्या आत निवडायची असल्याने नाट्य परिषदेची निवडणुक सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती शाखेचे संयुक्त कार्यवाह भाऊसहेब भोईर यांची निवडणुक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली. दरम्यान, बैठकीत कलाकार आणि निर्मातासंघ यांच्यात बैठक घेण्यात यावी, नाट्य परिषदेची गंगाजळी करावी, शासनाकडून मध्यवर्ती शाखेला जे पैसे मिळतात ते इतर शाखांनाही द्यावेत, नाट्यसंस्थांना े सभासद बनवून घेण्यात यावे, बकस्टेज आर्टिस्टसाठी पुरस्कार सुरु करण्यात यावा, एकपात्री कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे, ज्येष्ठ कलाकारांच्या सीडी बनविण्यात येत आहेत त्यासाठी एक समिती नेमण्यात यावी आदी सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

ज्योस्त्ना भोळे संगीत नाट्य महोत्सव
नाट्य परिषद पुणे शाखा आणि सुशील स्नेह परिवाराच्या वतीने येत्या 1 ते 3 जुलै दरम्यान ज्योत्स्ना भोळे संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलगे आहे. 1 जुलै रोजी संशय कल्लोळ, 2 जुलै रोजी आनंद भाटे यांची संगीत मैमल आणि 3 जुलै रोजी संगीत सौभद्र ही नाटके सादर होणार आहे. 4 जुलै रोजी पं. हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर अभ्यंकर यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ गायक अरविंद पिळगावकर यांचा सत्कार आमदार सा.रे. पाटील यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. तर, 4 जुलै रोजी त्रषीकेश बडवे याचा सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Comment