आठ दिवसांत शिक्षकांचे समाङ्मोजन करा -शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा

पुणे,. 23 (प्रतिनिधी) – राज्यभर सर्वत्र एकाच वेळी विद्यार्थ्यांची पटपडताळणी केल्याने अनेक ठिकाणी जादा शिक्षक असल्याचे स्पष्ट झाले पण अतिरिक्त शिक्षकांचे अन्य शाळांत समायोजन अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सर्व शिक्षकांचे समायोजन करा, असे आदेश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी राजपत्रित अधिकारी संघातर्फे आयोजित राज्यस्तरीय दुसरे अधिवेशनात बोलताना सांगितले. शालेश शिक्षण राज्यमंत्री प्रा. फ ौजिया खान, अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे, शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, गंगाधर म्हमाणे, आदी उपस्थित होते.

दर्डा पुढे म्हणाले, राज्य शासनाने राज्यात महसूल विभागाच्या वतीने सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी केली. त्यात 50 टक्यांहून अधिक गैरहजेरी असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या. या शाळांनी विद्यार्थी संख्या अतिरिक्त दाखवून शासनाचे कोट्यवधी रुपयाचे अनुदान लाटले, त्याही रोखण्यात आल्या. ज्या शाळा रद्द करण्यात आल्या आहेत, तेथील अतिरिक्त शिक्षकांचे अन्य शाळांत समायोजन करणे आवश्यक होते. मात्र, अद्यापपर्यंत ग्रामीण भागात अशा शिक्षकांचे समाजोयन होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. परिणामी, अनेक वर्षांपासून नवीन शिक्षक भरती थांबविण्यात आली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत अतिरिक्त शिक्षकांना शाळांमध्ये समायोजन करा, असे आदेश सर्व शिक्षण खात्यातील अधिकार्‍यांनाा दर्डा यांनी कार्यक्रमात दिले.

अधिकार्‍यांकडून शाळा तपासणी प्रभावी नाही. त्यामुळे अधिकार्‍यांनी आपली क्षमता वाढविली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण ह्नक कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शिक्षण खात्यातील सर्व अधिकार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावू, असेही दर्डा यांनी स्पष्ट केले. शिक्षणाच्या दर्जाबाबत कोणतेही तडजोड करता कामा नये. शिक्षणातून संस्कारशील विद्यार्थी घडला पाहिजे. अशा पद्धतीचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रा. फौजिया खान यांनी सांगितले. राजपत्रित अधिकारी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुन्नरकर यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Comment