वेगळ्या प्रयोगांना प्रेक्षकांची साथ आवश्यक – किरण राव

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – सध्याचा काळ हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळ्या, नवीन दिशेला नेऊ पहाणार्‍या दिग्दर्शक, निर्माता, कलाकारांचा आहे. विविध प्रवाहातील चित्रपट सध्या येत आहेत त्यातील नवनवीन, वेगळ्या प्रयोगांना प्रेक्षकांची योग्य साथ मिळण्याची आवश्यकता आहे असे मत प्रसिद्ध दिग्दर्शिका किरण राव यांनी शनिवारी व्यक्त केले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया ( एफटीआयआय )च्या 38 व्या चित्रपट समीक्षा अभ्यासवर्गाच्या समारोप प्रसंगी राव बोलत होत्या. यावेळी एफटीआयआयचे संचालक डी.जे. नारायण, राष्ट्रीय चित्रपट संग‘हालयाचे संचालक प्रशांत पाठरावे उपस्थित होते.

राव म्हणाल्या, चित्रपटसृष्टीसाठी महत्वपूर्ण योगदान देणार्‍या या इन्स्टिीट्युटमध्ये येण्याची माझी इच्छा फार पूर्वीपासून होती आज या निमित्ताने ती पूर्ण झाली आहे. सलग तीन आठवडे चित्रपट पहाणे, त्याचे विश्‍लेषण करणे हा आनंददायी अनुभव असणार यात शंकाच नाही. मी सोफाया पॉलिटेक्नीक मध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतांना फिल्म अ‍ॅप्रिशिएशनसाठी 1928 साली तयार करण्यात आलेला ‘बॅटलशिप फटींकन’ हा मूक चित्रपट पाहिला आणि चित्रपटांकडे पहाण्याची मवी दृष्टी मला यातून मिळाली. आपल्या आगामी ‘द शिप ऑफ थिसेस’ या चित्रपटाबद्दल सांगताना राव म्हणाल्या, आनंद गांधी दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीमध्ये वेगळी दिशा घेऊन येणारा ठरणार आहे. या चित्रपटाला विविध अंतररास्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाद मिळाली असून 17 जुलैला हा चित्रपट पुणे, मुंबईसह पाच शहरात प्रदर्शित होणार आहे. या शहरातील प्रतिसादानंतर हा प्रेक्षकंाच्या मागणीनुसार हा इतर शहरात हा चित्रप्पट प्रदर्शित केला जाणार आहे.

Leave a Comment