प्रेम म्हणजे… प्रेम असत सांगणारा !’ रांझणा’

तुम्ही पहिल्यांदा प्रेमात कधी पडले? असा प्रश्‍न आला तर अनेकांची उतरे शाळेत आठवी, नववीत शिकत असताना असे उत्तर येइल. त्या प्रेमाच पुढे काय झाल? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र आपल्याकडे नसते. सहाजिक शालेय जीवनात ते आकर्षण, पहिल प्रेम कॉलेजच्या पहिल्या पावलाबरोबर विरून गेलेले असते.पण, काही लोक त्या पहिल्या प्रेमाला आपल सर्वस्व देऊन बसतात आणि मग काय घडु शकत याच उत्तम चित्रण म्हणजे ‘आनंद राय दिग्दर्शित रांझणा’ हा रोमँटिक चित्रपट.

वाराणसीच्या गल्लीत घडणारी ही कथा आहे झोया (सोनम कपूर) या मुस्लिम आणि कुंदन (धनुष) या हिंदू मुलाची. शालेय वयात कुंदन झोयाच्या प्रेमात पडतो,
दरम्यानच्या काळात तो तिला प्रपोज करतो आणि त्यांची ताटातुट होते. आठ वर्षाच्या कालखंडनंतर झोया ब वाराणसीला परतते मात्र तीचे आयुष्यअ उऋणपणे
लबदललेले असते तर कुंदनच्या मनात आजही तीच झोया बसलेली आहे. आता झोयाचा एक बॉयफ्रेंड (अभय देओल) आहे. हीरो हिरोईनचा (सोनम कपूर) पाठलाग करतो. मात्र तो तिला कधीही नुकसान पोहोचवत नाही. उलट तो स्वतःलाच त्रास देतो. रांझणा हा एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपट आहे. अमिर खानच्या राजा हिंदुस्तानीमध्ये जसे हिरोईन सुशिक्षित आणि हीरो अशिक्षित दाखवण्यात आले होते. किंवा ही वेगवेगळ्या धर्माच्या मुला – मुलीच्या प्रेमकथा अनेक चित्रपटात मांडण्यात आल्या त्त्या प्रकारात रांझणा प्रथम दर्शनी बसतो. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला कथेचा नेमका आवाका लक्षात येतो.कारण, तनू वेड्स मनू’प्रमाणे या चित्रपटातही आनंद राय यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय, आणि हे धक्के थिएटरमध्येच अनुभवण्यासारखे आहेत. मुख्य म्हणजे, उगाच कथेमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी हे धक्के दिलेले नाहीयेत, तर प्रेक्षकांना पटतील अशाच प्रकारे त्यांचा वापर झालाय. कथेची मांडणी करताना लेखक-दिग्दर्शकांना समाजातील प्रश्नांची जाण आहे हेही लक्षात येतं. रांझणामध्ये केवळ हिरो-हिरोईनचं प्रेम नाही तर दिल्लीमधील युवावर्गाच्या मनातली खदखदही दिसते.

हा चित्रपट म्हणजे साधी, सरळ प्रेमकथा नाही तर प्रेमात पडलेल्या रांझणाचा जीवनपटच इथं बघायला मिळतो. कुंदन तसा हा मूळचा तामिळनाडूचा, पण दोन
पिढ्यांपासून त्याचे कुटुंब वाराणसीमध्ये स्थायिक आहे. या भूमिकेसाठी धनुषची निवड योग्य आहे. धनुष तामिळनाडूमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याला
देशभरातील लोक ’कोलावरी डी’ या गाजलेल्या गाण्यासाठी ओळखतात. धनुषसाठी त्याची हिंदी भाषा दुरुस्त करणे आणि बनारसी शैलीत बोलणे सोपे काम नव्हते.
ब-याच वेळा त्याच्या बोलण्यात तामिळ भाषेचा प्रभाव दिसून येतो. धनुषला सोनम आणि अभय देओलने दिलेली साथ उत्तम आहे.

बर्‍याच काळानंतर अतिशय स्वच्छ, निर्मळ असा चित्रपट आलेला आहे.यात सेक्स नाही, हिंसा नाही, उगाच डबल मिनिंग डायलॉग्ज नाहीत, आयटम साँगही नाही, उलट जीवन जगण्याची एक वेगळी फिलॉसॉफी आहे. ए.आर.रहमानने सुध्दा रॉकस्टार’नंतर जादुई संगीत सादर केलंय. चित्रपटातील लोकेशन्स सुंदर आहेत. तनु वेड मनु नंतर आनंद राय यांनी एका वेगळ्या, फ्रेश जोडप्यसह, वेगळ्या पद्धतीने सादर केलेल्या प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असत सांगणार्‍या रांझणाचा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही.

चित्रपट – रांझणा
निर्माता – कृषिका लुल्ला
दिग्दर्शक – आनंद राय
संगीत – ए. आर रहमान
कलाकार – सोनम कपूर, धनुष,अभय देओल, शिल्पी मारवाह, सूरज सिंह, मो. जीशान अयूब

रेटिंग – * * *

Leave a Comment