प्रभुदेवासोबत थिरकणार श्रीदेवी

बॉलीवुडची रूप की रानी श्रीदेवी आता डांसिंग किंग प्रभुदेवा सोबत इंटरनेशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार (आइफा) मध्ये थिरकणार आहे. आगामी काळात श्रीदेवी, प्रभुदेवाच्या नृत्य दिग्दर्शनाखाली मिस्टर इंडियाच्या हवा हवाई, आणि चालबाज या सिनेमातील गाण्यावर थिरकणार आहे.

गेल्या तीन दशकापासून सिनेकलावंत इडियन फिल्म अकादमी पुरस्कार (आइफा) मध्ये सहभागी होतात. या मध्ये अभिनेत्री श्रीदेवी सहभागी होऊन सिने करियरमधील हिट नंबरवर थिरकताना दिसणार आहे.

यावेळी इडियन फिल्म अकादमी पुरस्कार (आइफा) मध्ये भारतीय सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाल्याची झलक दाखविण्यात येणार आहे. हा आइफा पुरस्कार २०००मधील बॉलीवुड कलाकाराना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार समारंभ लंडन मध्ये आयोजित करण्यात आला आहे. १४ वा आइफा पुरस्कार समारंभ मकाउ येथे चार जुलै रोजी होणार आहे.

Leave a Comment