७२ हजार जणांचे वाचविले प्राण- सुशीलकुमार शिंदे

उत्तराखंड : गेल्या चार दिवसापासून बचावकार्य जोमाने सुरु आहे. या महाप्रलयातून आतापर्यंत ७२ हजार जणांना वाचवण्यात यश आले आहे. येत्या दोन दिवसात अडकलेल्या आणखी ३५ ते ४० हजार नागरीकाना वाचवण्यात येईल, असा विश्वास आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

डेहराडूनमध्ये दाखल झालेल्य़ा सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी या ठिकणी सुरु असलेल्या बचावकार्यची माहिती घेतली. दरम्यान, या महाप्रलयात शेकडो मृतदेह हळूहळू मिळत आहेत. पण त्यांची ओळख पटवणं अत्यंतजिकीरीचं असल्याने त्यांचा डीएनए आता संवर्धित करून ठेवला जाणार आहे.

गेल्या चार दिवसापासून बचावकार्य जोमाने सुरु आहे. त्यामुळे या परिसरात तसेच घटनास्थळी नेत्यांनी गर्दी करू नका, त्यामुळे काम करताना आढथळा निर्माण होत आहे . असा सल्ला गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे.