मुंबई दि.२२ – बॉलिवूड स्टार धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी कन्या आहना हिचा साखरपुडा जुहू येथील हेमामालिनी यांच्या निवासस्थानी काल साजरा झाला. दिल्लीतील व्यावसायिक वैभव व्होरा हे हेमा धर्मेंद्रचे दुसरे जावई आहेत.

गेल्याच वर्षात हेमा धर्मेंद यांची मोठी कन्या ईशा हिचा विवाह व्यावसायिक भरत तख्तानी यांच्यासोबत साजरा झाला होता. आता दुसर्या कन्येनेही बोहल्यावर चढण्याची तयारी केली आहे. वैभव आणि आहना यांची ओळख मित्रांनीच करून दिली होती आणि लव्ह अॅट फर्स्ट साईट असाच प्रकार घडला होता असे त्यांच्या मित्रमैत्रिणांचे म्हणणे आहे.
वैभव व्होरा यांनी अमेरिकेतून बिझीनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. आहनाला साखरपुडा घरच्याघरी आणि अगदी जवळच्या नातेवाईकांसोबतच साजरा करण्याची इच्छा होती त्यानुसार हा संभारंभ अगदी घरगुती स्वरूपात साजरा झाला. तिच्या मित्रमैत्रिणींनी सोशल साईटच्या माध्यमातूनच या दोघांना शुभेच्छा दिल्या असेही समजते.