शिक्षक वाढल्याने सीईटी परीक्षा थांबविली

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – शासन स्तरावरून घेण्यात आलेल्या पटपडताळणीत अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांची अन्य शाळेत समायोजन सुरू आहे. ही प्रकि‘या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी सीईटी घेण्यात येणार नाही, अशीमाहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती सीईटीच्या परीक्षेद्वारे केली जाते.मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सीईटी झाली नाही आणि शिक्षकांच्या नियुक्तीही झाल्या नाहीत. परिणामी, अनेक डीएड उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर सीईटी घ्यावी, अशीमागणी डीएड उमेदवारांतून होत आहे.

राज्य शासनाने 1 ते 5 ऑ्नटोबर 2011 रोजी राज्यात एकाच वेळी सर्व शाळांची पटपडताळणी केली. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. यात 50 ट्न्नयांहून अधिक गैरहजेरी असलेल्या शाळांचीमान्यता काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. काही शाळांचीमान्यता काढण्याबाबत सुनावणी सुरू आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी राज्यात 1400 शाळांची मान्यता काढण्यात येणार असून, आतापर्यंत 392 शाळांची मान्यता काढण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे या शाळांत अतिर्नित ठरलेल्या शिक्षकांना प्रथमत: सामावून घेण्याचे कार्यवाही सुरू आहे. ही प्रकि‘या पूर्ण झाल्यानंतरच शासनाकडून सीईटी घेण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.