मंदाकिनीमुळे बदलावे लागले सोनाक्षीचे नाव

– एखादा चित्रपट वास्तव घटना वा कथेवर आधारलेला असतो तेव्हा तो बर्‍याचदा वादास कारणीभूत ठरतो. त्यामुळे असा चित्रपट करणारा निर्माता तो वादात सापडू नये यासाठी पुरेपूर काळजी घेत असतात. खासकरून एकता कपूरचा चित्रपट असेल तर ती अशीच संधीच कुणला देत नाही. एकताच्या ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन’ या चित्रपटाच्या बाबतीत तिने अशीच खबरदारी घेतली आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाच्या पात्राचे नाव यास्मिन ठेवण्यात आले होते.

मात्र नंतर ते बदलून ज्ॉस्मिन करण्यात आले आणि यामागे कारण ठरली जुन्या जमान्यातील अभिनेत्री मंदाकिनी. ‘राम तेरी गंगा मैली’सारख्या सुपरडुपर हिट चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आलेल्या मंदाकिनीचे मूळ नाव यास्मिन जोसेफ होते. त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र तसे काही होण्याआधीच एकताने सोनाक्षीच्या पात्राचेच नाव बदलून घेतले आहे. या चित्रपटाचे चित्रण जवळपास आटोपत आले आहे, पण हा निर्णय बराच उशिराने घेण्यात आला असल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील अंडरवर्ल्ड टोळ्य़ांवर बेतलेल्या या चित्रपटांत अक्षय कुमार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची भूमिका साकारत आहे. याच दाऊदसोबत मंदाकिनीचे नाव त्याची प्रेयसी या रूपात जोडले गेले होते. त्यांची अनेक एकत्रित छायाचित्रेही त्या वेळी झळकली होती. अर्थात मंदाकिनीने मात्र दाऊदसोबत आपले संबंध असल्याचे कधीच मान्य केले नव्हते. आता या चित्रपटात सोनाक्षीचे नाव यास्मिन नाव ठेवण्यामागे सरळ-सरळ मंदाकिनीचे खरे नाव ठेवण्याचाच हेतू होता. त्यामुळे मंदाकिनीकडून त्याला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता होती. ही कटकट टाळण्यासाठीच एकताने मोठय़ा विचारांअंती या चित्रपटातील सोनाक्षीचे नाव बदलणेच योग्य समजले.

Leave a Comment