मुंबई, दि.2१ (प्रतिनिधी) – राज्य लोकसेवा आयोगाच्या गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा मे 2013 मध्ये जाहीर केलेल्या निकालावर उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. या निकालाविरोधात दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती रेखा सौेदुरबलदोटा यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. तसेच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिकाकर्त्यांची निर्णयाला स्थगिती देण्याची विनंतीही फेटाळली.
त्यामुळे जुनाच निकाल कायम राहणार आहे. आयोगाच्या या निकालाविरोधात अभिजीत निकम आणि महेश सिंघल या दोन उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका
दाखल केली होती. परीक्षेत 22 गुणांचे चुकीचे प्रश्न रद्द करून आयोगाने 13 मे रोजी जाहिर केलेला निकाल हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार्या विद्यार्थ्यावर अन्याय करणारा आहे. ज्या उमेदवारांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी परीक्षेत वेळ खर्च केला, त्या वाया गेलेल्या वेळेची व श्रमाची भरपाई त्यांना मिळाली नाही. मात्र हे
प्रश्न सोडून देणार्या उमेदवारांना आयोगाच्या निर्णयाचा अप्रत्यक्ष लाभच झाला, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना निदान काही गुण द्यावेत .आणि निकाल नव्याने जाहिर करण्याचा आदेश द्यावा अशी विनंती याचिकेत केली होती.