हरभजन करतोय पूरग्रस्ताना मदत

देहरादून – क्रिकेटर हरभजन सिंग गेल्या तीन दिवसांपासून उत्तराखंडमधील पुरात अडकून पडलाय. पण, येथेही तो शांत न बसता पूरपरिस्थिती अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. सध्या तो पूरग्रस्त भागातील जोशीमठात अडकला आहे. त्याचे हे कार्य सर्व जनांसाठी प्रेरणादायी आहे.

गेल्या चार दिवसांपासून ‘हेमकुंड साहेब’च्या दर्शनासाठी निघालेला हरभजन सिंग पावसाच्या दणक्याने चांगलाच फसला आहे. हिमाचल प्रदेशातील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप झाल्यानंतर त्याचा फटका हरभजनलाही बसला. येथे जवळजवळ ६०० जवान बचावकार्यात गुंतले आहेत. त्यांची मदत करण्याचा आणि अडकलेल्या नागरीकाना दिलासा देण्याचा प्रयत्न भज्जी येथे करतो आहे.

उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये १२ हॅलिकॉप्टर बचावकार्यात गुंतले आहेत. पिथौरागडच्या धारचुलामध्ये आयटीबीपी, एनएचपीसी आणि बीआरओचे १६ भवन, गोरखा रेजिमेन्टचे १२ बरॅक, एक गाड्यांचा पूल, आयटीबीपीचा सेला कँप आणि पॉवर हाऊस तसंच कर्मचाऱ्यांचे क्वार्टरही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले आहेत

Leave a Comment