गॅलार्डो स्पोर्टस कारची लिमिटेड एडिशन भारतात सादर

लँबॉर्गिनी ऑटोमोबिलो या इटालियन सुपर लकझरी कार उत्पादकांनी त्यांच्या गॅलार्डो या अतिउच्च दर्जाच्या स्पोर्टस कारची लिमिटेड एडिशन भारतात गुरूवारी सादर केली आहे. गॅलार्डो एलपी ५५०-२ ही गाडी खास स्पोर्टस कारच्या हौशी दिवान्यांसाठीच सादर केली असून अशा फक्त सहाच कार भारतात विकल्या जाणार आहेत. या गाडीची एकस शो रूम किमत आहे ३.०६ कोटी रूपये.

लँबोर्गिनी इंडिया ऑपरेशन्सचे हेड पवन शेट्टी या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की गॅलार्डो एलपी ५५०-२ तीन रंगात उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात ऑरेंज, पांढरा आणि हिरवा रंग आहे. ही कार खास भारतासाठी बनविली गेली असल्याने त्यात भारताच्या तिरंग्याचा रंगांसाठी वापर केला गेला आहे. कंपनीने भारतात व्यवसायास सुरवात केल्यापासून कंपनीच्या उत्पादनांचा खास भारतीय वर्ग तयार झाला असल्याचेही ते म्हणाले. २००६ पासून कंपनीने ९० सुपर लक्झरी कार विकल्या गेल्या आहेत.गेल्या दोन वर्षात कंपनीने ३१ गाड्या विकल्या आहेत.