पोर्श केमन एस भारतात दाखल – किंमत रू.९४ लाख

मुंबई दि.१९ – जर्मन लक्झरी कार मेकर पोर्शे इंडिया कंपनीने त्यांच्या केमन एस चे नवे व्हर्जन भारतात सादर केले असून त्याची किंमत आहे ९४ लाख रूपये. पूर्वीच्या मॉडेलपेक्षा हे नवे व्हर्जन अधिक वेगवान, इफिशिएंट आणि जादा पॉवरफुल आहे. अन्य स्पोर्टस कार प्रमाणेच ही कार रस्त्यावरील अवघड वळणे अगदी सहज पार करू शकते परिणामी रोजच्या ड्रायव्हिंग मध्येही स्पोर्टस कार चालविल्याचा आनंद चालकाला मिळू शकणार आहे.

पोर्शे इंडियाचे संचालक अनिल रेड्डी या संबंधी अधिक माहिती देताना म्हणाले की पूर्वीच्या मॉडेलपेक्षा या कारचे वजन ३० किलोंनी कमी केले गेले आहे. १०० किमी मागे नवीन इंजिनमुळे १५ टक्के इंधन बचत होऊ शकणार आहे. पोर्शे इंडिया ही व्होक्सवॅगन सेल्स इंडिया प्रा. लिमिटेडचाच एक भाग असून त्यांचे मुख्यालय मुंबईतआहे. पोर्शेच्या सर्व गाड्या भारतात सध्या आयातच केल्या जातात. त्यात ९११ बॉक्स्टर एस, केमन एस, सायेन्ना आणि पॅनामेरा या मॉडेल्सचा समावेश आहे.