वाई गंधर्व संगीत महाविद्यालयाचे दोन अभ्यासक‘म

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – अभिजात संगीत कलेचा वारसा लाभलेले सवाई गंधर्व संगीत महाविद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने दरवर्षी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक‘म राबवले जातात. या वर्षापासून खास मुलांसाठी दोन वेगवेगळ्या वयोगटांमध्ये दोन स्वतंत्र अभ्यासक‘म राबविण्यात येणार आहेत.

पहिला गट हा इयत्ता 5 वी ते 10 वी तील मुलामुलींसाठी असून, दुसरा गट हा 16 वर्षापुढील सर्वांसाठी आहे. नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची गोडी लागावी या उद्देशाने अभ्यासक‘मांची सुरुवात करण्यात येत आहे. शास्त्रीय संगीताची प्राथमिक तोंडओळ्ख हा पहिल्या वयोगटाचा अभ्यासक‘म असेल. मुलांनी मोकळेपणाने शिकावे या हेतूने पहिल्या वयोगटासाठी कुठलीही परीक्षा ठेवलेली नाही. परंतु, या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. लेखी अभ्यासापेक्षा प्रात्याक्षिकावर भर देण्यात येणार आहे. शास्त्रीय संगीताची तोंडओळख, रागांचे ज्ञान, ताला-सुरांची ओळ्ख, स्वरलिपी, बंदिशी हा दुसर्‍या वयोगटासाठीचा अभ्यासक‘म असून विद्यार्थ्यांना लेखी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरुपाच्या परीक्षा असणार आहेत. दुसर्‍या वयोगटातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे  प्रमाणपत्र देण्यात येईल.

Leave a Comment