बिजिग दि.१८ – अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचे फोन रेकॉर्ड आणि इंटरनेट डेटा तपासाचे गुपित उघड करणारा आणि त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला एडवर्ड स्नोडेन हा चीनी खबर्या किंवा गुप्तहेर किंवा एजंट असल्याचा अमेरिकेने केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटा असल्याचे चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुकींग यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेची गुपिते फोडल्यानंतर सीआयएचा माजी गुप्तवार्ता कॉन्ट्रक्टर असलेल्या स्नोडेनने अमेरिकेतून पळ काढून हाँगकाँगमध्ये आश्रय घेतला आहे. त्यावर अमेरिकेचे उपाध्यक्ष डीक चेने यांनी स्नडेनने हाँगकाँग मध्ये आश्रय घेण्यामागे तो चीनचा खबर्याे असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्याला उत्तर देताना चुकींग बोलत होत्या. २९ वर्षीय स्नोडेनने २० मे रोजी हॉगकाँग मध्ये पलायन केले असून सध्या तो तेथूनही गायब झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याने आपल्याजवळील वरील विषयाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे वॉशिंग्टन पोस्ट आणि गार्डियन या वृत्तपत्रांकडे पाठवून त्याने केलेल्या विधानांची सत्यता पटविण्याचा प्रयत्न केला आहे.
स्नोडेनने अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा प्रिझम प्रेाग्राम गुगल, फेसबुक, अॅपलसह अन्य इंटरनेट कंपन्यांना कसा थेट अॅक्सेस उपलब्ध करून देणारा आहे या संबंधीची कागदपत्रे उघड केली आहेत.