शब्दप्रधान विनोदनिर्मिती असलेला कौटुंबिक चित्रपट हे मराठी चित्रपटाचे बलस्थान आहे. नात्यांमधील घट्ट वीण, आपापसातील वाद-विवाद व त्यातून निर्माण होणारा विनोद यामुळे मराठी चित्रपट निखळ मनोरंजन करतो. सुधा प्रॉडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या आगामी आंधळी कोशिंबीर या चित्रपटातून रसिकांना अशाच मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळणार आहे.
अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शन तर्फे निर्मित आंधळी कोशिंबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे करत आहेत. नात्यांमधील आंधळ्या कोशिंबीरीचा खेळ आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. सध्या पुणे परिसरामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, ङ्गसध्या समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टीकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणीवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून चांगला विनोद निर्माण होतो. या चित्रपटामधून तीन पिढ्यांमधील कलाकार एकत्र येत आहेत.तसेच बर्याच वर्षांनंतर अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेचा आस्वाद या चित्रपटामधून रसिकांना घेता येणार आहे. त्यांच्यासोबत वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, प्रिया बापट, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, ऋषिकेश जोशी आदीकलाकार काम करत आहेत. आंधळी कोशिंबीरफ ची पटकथा आणि संवाद आदित्य इंगळे आणि प्रताप देशमुख यांनी लिहिलेले आहेत. चित्रपटामध्येे तीन सुरेल गाणी आहेत. यापैकी एका गाण्याला प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी तर बाकी दोन गाण्यांना अविनाश-विश्वजित या संगीतकार द्वयींनी उत्तम संगीत दिलेले आहे. वैभव जोशी यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत.