सनीला तोडायचीय हॉट प्रतिमा

सनी लियॉनचे नाव घेताच एका हॉट व बिनधास्त अभिनेत्रीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. कारण तिची प्रतिमाच अशी आहे. या कॅनेडियन पॉर्न स्टारचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जातात तेव्हा त्यांनाही सनीकडून तिच्या प्रतिमेला साजेशा भूमिकेचीच अपेक्षा असते.

आपल्या या प्रतिमेचा सनीला अनेक वेळा फायदाही झाला आहे. मात्र बॉलिवूडमध्ये प्रदीर्घ कारकीर्द घडविण्याचा निर्धार केलेली सनी आता या प्रतिमेच्या जोखडातून बाहेर पडू इच्छीत आहे. त्या दिशने तिने पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे. नुकताच तिने आपल्या प्रतिमेला छेद देत टिना अँड लोलो नावाचा एक चित्रपट स्वीकारला असून त्यामध्ये ती एका साध्यासरळ तरुणीची
भूमिका रंगविताना दिसेल. पराग सिंघवीने या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याच्या म्हणण्यानुसार, सनीला या चित्रपटात असे काही सादर केले जाईल की, त्यास सेन्सॉरची कात्री लागणारच नाही.

सनीशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर केवळ ग्लॅमर आणि हॉट प्रतिमेच्या जोरावर इथे फार काळ टिकाव धरता येणार नाही, हे आता तिला चांगल्याप्रकारे उमगले आहे. त्यासाठी तिला अभिनयातही कमाल दाखवावी लागणार आहे. सोबतच अशा भूमिका निवडाव्या लागतील ज्यामध्ये अभिनय करण्यासही वाव असेल. याच कारणांमुळे तिने परागसोबत एक नव्हे तर तीन चित्रपटांचा करार केला आाहे.

त्यापैकी दोन चित्रपटांतील भूमिका तिच्या प्रतिमेच्या विपरीत आहे तर एक अँक्शनपट आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा सवाल असा की, प्रेक्षक सनीला अशा प्रकारच्या नॉनग्लॅमरस चित्रपटांमध्ये स्वीकारतील का? सनीची जी प्रतिमा आहे, ती एवढय़ा सहजासहजी मोडीत काढणे सोपे नाही आणि जिस्म-२ मध्ये तिने जसा अभिनय केला आहे, तो पाहता तिच्याकडून फारशी अपेक्षा वाटत नाही. सनीचे प्रेक्षक खास आकर्षणापोटी तिचे चित्रपट पाहण्यास जातात. ते तिला वेगळ्या भूमिकेत स्वीकारतात की नाही, हे टिना अँड लोलो प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Leave a Comment