काही चित्रपटांमुळे काही कलावंत परिचित होतात तर काही कलावंतांमुळे चित्रपट परिचित होतो, परंतु या दोन्ही विभागात मोडणारा आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या सदरक्षणाय चित्रपटांतर जे.जे. क्रियेशन्स निर्मितीसंस्थेचा, जयंत गिलाटर यांचा रणभूमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
विक्रम गोखले, अमोल कोल्हे, उर्मिला कानेटकर, शंतनू मोघे, उषा जाधव, मनोज जोशी, निरंजन नामजोशी इ. स्थितप्रज्ञ कलावंतांच्या अभिनयाने नटलेल्या रणभूमी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शौनक शिरोळे यांनी केले आहे. विशेष म्हणजे नुकतेच अनुमती या चित्रपटात विक्रम गोखले यांना प्रमुख भूमिकेसाठी सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर अभिनेत्री उषा जाधव यांना धग या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान मिळाला असून समीधा या चित्रपटासाठी उत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे…रणभूमी चित्रपटाचे हे एक प्रमुख आकर्षण आहे की या चित्रपटांत हे तिघे एकत्र आले असून त्याव्यतिरिक्त चित्रपटात अनेक दिग्गज कलावंत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा एक संवेदनशिल आणि उत्कृष्ट अशी कलाकृती प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.