पुणे तरूणाई फेसबुक वापरात देशात नंबर वनवर

पुणे दि. १८- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने देशभरातील प्रमुख चौदा शहरात ट्वीटर सॅव्ही, फेसबुक फ्रेडली आणि हेवी इंटरनेट युजर्स संबंधी केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील जेन नेक्स्ट म्हणजे तरुणाई देशात आघाडीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणात या १४ शहरातील  बारा ते चौदा या वयोगटातील १७४७८ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. मुंबई, बंगलोर, दिल्ली, नागपूर, कोइमतूर, अहमदाबाद, कोलकाता, हैद्राबाद अशा शहरात हे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणातून गोळा झालेल्या डेटावरून पुढील पिढीच्या त्यातही टीन एजर्सच्या बदलत्या जीवनशैलीची माहिती मिळू शकणार आहे.

आधुनिक काळातील संदेश दळणवळण क्षेत्रासाठी वापरल्या जाणार्याी उपकरणात सेलफोन आघाडीवर असणे स्वाभाविक आहे. या सर्वेक्षणानुसार ६८ टक्के मुलांकडे किमान एक तरी सेलफोन आहेच. सोशल साईट वापरात पुण्यातील तरूणाई आघाडीवर असून येथे फेसबुकचा वापर करणार्याे टीन एजर्सचे प्रमाण ९१ टक्के इतके आहे. मुंबईत हेच प्रमाण ८३ तर नागूपरमध्ये ते ५६ टक्के इतके आहे.

इंटरनेटचा अॅक्सेस घरातच उपलब्ध असण्यातही पुणेकरच आघाडीवर असून येथे हे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. मुंबई व नागपूरमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ७० व ४४ टक्के इतके आहे. पुण्यातील ही नेक्स्ट जनरेशन दिवसातून किमान अर्धा तास तरी फेसबुकवर घालविते असेही दिसून आले आहे. शालेय जीवनापासूनच फेसबुकचा वापर ही तरूणाई करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.