केंद्रीय मंत्रिमंडळात माणिकराव गावित यांचा समावेश

नवी दिल्ली दि.१८ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ.सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत मंत्रिमंडळात आठ नव्या मंत्र्यांना स्थान दिले आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आठ जणांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

महाराष्ट्रातून माणिकराव गावित यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. गावित यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर संतोष चौधरी, आंध्रचे नेते जे डी सेलम आणि नचिप्पन यांनाही राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्यामध्ये राजस्थानचे सिसराम ओला आणि ऑस्कर फर्नांडिस, डॉ. गिरीजा व्यास आणि आंध्र प्रदेशचे के.एस.राव यांचा समावेश आहे.  ना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. व्यास यांच्याकडे गृह आणि शहरी विकास मंत्रालयाची, राव यांच्याकडे वस्त्रोउद्योग मंत्रालयाची, फर्नांडिस यांच्याकडे  रस्ते विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नविन मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ७७ वर पोहचली आहे. या शपथविधी सोहळ्यास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग,  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते.

Leave a Comment