श्‍वेता दुसर्‍यांदा चढतेय बोहल्यावर

टीव्हीवरील अनेक कौटुंबिक मालिका आणि रिअँलिटी शोमध्ये चमकणारी अभिनेत्री श्‍वेता तिवारी लवकरच दुसर्‍यांदा लग्नबेडीत अडकणार आहे. खरेतर आपला आधीचा पती राजा चौधरीसोबत घटस्फोट झाल्यानंतर लगेचच श्‍वेता विवाह करणार असल्याची चर्चा होती, मात्र घटस्फोटाला सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही ती लग्न करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत नाही. सध्या ती लाईफ ओके वाहिनीवरील झलक दिखला जा या नव्या डान्स रिअँलिटी शोच्या नव्या
पर्वात स्पर्धकाच्या रूपात सहभागी आहे. या शोसाठी सध्या ती जोरदार मेहनत घेत आहे.

नाच शिकण्यामध्येच ती बराचसा वेळ खर्ची होत असल्याने तिला जराही फुरसत नाही. राजा चौधरीकडून रोजच होणार्‍या मारहाणीमुळे वैतागलेल्या श्‍वेताने त्याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी २00७मध्ये अर्ज दाखल केला होता. या अर्जावर तब्बल पाच वर्षे सुरू असलेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर डिसेंबर २0१२मध्ये तिच्या घटस्फोटाच्या अर्जावर मंजुरी मोहर उमटली. पाच
वर्षे सुरू असलेल्या या कायदेशीर लढय़ामध्ये तिचा नवा प्रियकर अभिनव कोहलीने तिला सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे घटस्फोट मिळताच श्‍वेता अभिनवच्या गळ्य़ात वरमाला घालून नव्या संसाराला सुरुवात करेल, असा कयास बांधला जात होतात. मात्र तसे काही झाले नाही व आजही त्या दिशेने तिची काहीच हालचाल दिसत नाही. तिच्या घटस्फोटाला जवळपास सहा महिने उलटून
गेल्याने श्‍वेता व अभिनव अजूनही बोहल्यावर का चढले नाहीत, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आपल्या लग्नाबाबत बोलताना श्‍वेता सांगते की, माझा घटस्फोट नुकताच कुठे झाला आहे आणि असेही नाही की, लग्न करण्यासाठीच मी घटस्फोटाला मंजुरी मिळण्याची वाट पाहत बसले होते. अभिनयशी मी नक्कीच लग्न करणार नाही, पण तूर्तास त्याचा मुहूर्त नक्की नाही. मात्र चालू
वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही नक्कीच लग्नबेडीत अडकू, असेही तिने स्पष्ट केले.