वडिलांच्या आठवणीने गहिवरले ओबामा

वॉशिंग्टन दि.१७ – रविवारी म्हणजे १६ जूनला जगभर साजर्याष झालेल्या फादर्स डे च्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या वडिलांच्या आठवणीने गहिवरले. एका कार्यक्रमात बोलताना ओबामांनी वडिलांचे छत्र फारच लहानपणी हरविल्याचे सांगितले. ते म्हणाले की आज वडील माझ्या जीवनात असते तर आम्ही लहान मुलांच्या संरक्षणासाठी जे कायदे करत आहोत त्यात त्यांनी माझी पाठराखण केली असती.

आज आपण अशा जगात आहोत की पृथ्वीवरच्या कोणत्याही भागात कुणाशीही आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपर्क साधू शकतो. मात्र आपण कितीही आधुनिक जगात वावरत असलो तरी प्रेम आणि परस्पर सहकार्य यांना पर्याय असू शकत नाही. त्यातही आपल्या मुलांशी आपण अधिक जवळ असणे याला अधिक महत्त्व आहे.

ओबामा यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील विभक्त झाले होते व ओबामांचे पालन त्यांच्या आजी आजोबांनी आणि आईने केले आहे. या तिघांनीही माझ्यासाठी  खूप कष्ट घेतले पण मी वडीलांचा सहवास कधीच घेऊ शकलो नाही असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment