उत्तराखंडामध्ये पुराचे थैमान: आठ जणाचा मृत्यू

उत्तराखंड: उत्तराखंड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. सर्वच नद्यांनी महापूर आल्याने आठ जणाचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून देवदर्शनासाठी गेलेले अनेकजण पुरात अडकून पडले आहेत. चार धामच्या यात्रेला गेलेले अनेक यात्रेकरु गंगोत्री आणि यमुनोत्रीत अडकले आहेत.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने झाडे, गाड्या आणि सात मजली इमारतीही या नद्यांच्या प्रवाहात वाहून गेल्या. तसेच या महापुरामुळे नदीकाठची अनेक मंदिरे पाण्यात वाहून गेली. चार धामच्या यात्रेला गेलेले अनेक यात्रेकरु गंगोत्री आणि यमुनोत्रीत अडकले आहेत. तर हरिद्वारमध्येही मुसळधार पावसाने गंगा नदीला पूर आला आहे. यामुळे शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मदत कार्यासाठी भारतीय सेनेला पाचारण करण्यात आले आहे. केदारनाथ येथे देवदर्शनासाठी गेलेले वीस हजार नागरिक अडकून पडले असल्याचे समजते.

दरम्यान, भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिहं हा देखील उत्तरकाशीत अडकला असून आपण सुरक्षित असल्याचं त्यानं ट्विटरवर सांगितलं आहे. या परिसरातील जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले आहे. मदतकार्य सध्या जोमाने सुरु आहे.

Leave a Comment