ऑडीने आणला ऑडीच्या आकाराचा संगणक माऊस

मुंबई दि.१७ – जर्मन लकझरी कार उत्पादक कंपनी ऑडीने ऑडी कारच्या आकाराचा वायरलेस संगणक माऊस भारतात सादर केला आहे. भारतातील कंपनीच्या सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे हा माऊस उपलब्ध असून त्याची किमत आहे ५५९९ रूपये.

कार्यालय अथवा घरच्या संगणकासाठीही हा माऊस उपयुक्त असून २.४ जीएच २ तंत्रज्ञानाचा वापर त्यात केला गेला आहे. स्क्रोल व्हील, हाय रेझोल्युशन सेन्सर अशी त्याची अन्य वैशिष्ठे असून तो राखी रंगात उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ऑडी कारचे प्रेमी आता त्यांची आवडती लक्झरी कार कार्यालयात नेतानाच ऑडीच्या कारच्या आकाराचा हा माऊसही कार्यालयात वापरू शकतील. त्यामुळे त्यांची कार सतत त्यांच्यासोबत असल्यासारखे युजरला फिलिग येईल.

स्लीक डिझाईनचा हा माऊस स्पर्शालाही अतिशय आरामदायी असल्याचा कंपनीचा दावा आहे. ऑडीच्या भारतात उपलब्ध असलेल्या अन्य उत्पादनांत हाय एंड क्लासिक क्रोनोग्राफ घड्याळे, मेसेंजर बॅग, स्पोर्टस बँग, ट्रॅव्हल बॅग्ज, बॅकपॅक, स्टायलिश गार्मेंट बॅग्ज व ऑडी आर ८ व्हीएसबी मेमरी स्टीक यांचा समावेश आहे.