नसीरुद्दीन शाह होणार पत्रकार

बॉलीवुडचा अभिनेता नसीरुद्दीन शाह आगामी काळात येत असलेल्या ‘डर्टी पॉलिटिक्स’ या सिनेमात पत्रकाराचा रोल करीत आहे. या सिनेमातून तो पत्रकाराच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

नसीरुद्दीन शाहच्या ‘डर्टी पॉलिटिक्स’या सिनेमातील रोल बाबत बोलताना सिने निर्माता के.सी.बोकाडिया म्हणाले, आगामी काळात निमिती करीत असलेल्या ‘डर्टी पॉलिटिक्स’ या सिनेमात पत्रकाराची भूमिका करण्यास नसीरने होकार दर्शविला आहे. नसीर हा एक सदाबहार अभिनेता आहे. त्यामुळे तो पत्रकाराच्या भूमिकेत सुद्धा फिट बसतो. ‘डर्टी पॉलिटिक्स’ या सिनेमाची शूटिंग राजस्थानमध्ये करण्यात येणार आहे. लवकरच सर्व टीम शूटच्या कामाला लागणार आहे.’

के.सी.बोकाडियाचा ‘डर्टी पॉलिटिक्स’ हा सिनेमा भंवरी देवी गैंग रेपवर आधारित असल्याची चर्चा आहे. या सिनेमात मल्लिका शेरावत भंवरी देवीची भूमिका करीत आहे. या सिनेमात मल्लिका आणि नसीर यांच्याशिवाय जैकी श्रॉफ, ओमपुरी आणि अनुपम खेर यांची मुख्य भूमिका आहे.

Leave a Comment