इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मध्यममार्गी नेते म्हणवल्या जाणार्या हसन रोहानी यांची निवड झाली आहे. देशाचे गृहमंत्री मुस्तङ्गा महंमद नज्जर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. इराणच्या निवडणूक विषयक कायद्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या ङ्गेरीत एकूण मतदानाच्या ५० टक्के पेक्षा अधिक मते मिळविणार्या उमेदवारालाच विजयी घोषित केले जाते. गेल्या शुक्रवारी इराणच्या या निवडणुकीत ७२ टक्के मतदान झाले होते आणि शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत ३ कोटी ६७ लाख मतांची मोजणी झाली होती. या ङ्गेरीत रोहानी यांना १ कोटी ८६ लाख मते मिळाली. ती ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
इराणच्या अध्यक्षपदी रोहानी
इराणमध्ये सत्तेची सूत्रे धार्मिक नेत्यांच्या हातात आहेत. मात्र यावेळी या धार्मिक नेत्यांना सुधारणावादी मध्यममार्गी नेत्यांनी आव्हान दिले होते. आव्हान देणार्या या वर्गाचे नेते म्हणून रोहानी हे पुढे आले होते. असे असले तरी सत्तेवर मक्तेदारी असलेल्या धार्मिक नेत्यांचाच विजय होणार असे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र या अंदाजांचा छेद देऊन रोहानी यांनी विजय मिळविला. धार्मिक नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून उभे असलेले तेहरान शहराचे महापौर महंमद बकर क्वालीबाङ्ग यांना पहिल्या ङ्गेरीत केवळ १६ टक्के मते मिळाली. रोहानी यांनी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा धुवा उडवला.
या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेमध्ये इराणचे परराष्ट्र धोरण हा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. कारण इराण हा देश नवी अणुशक्ती म्हणून पुढे येत आहे आणि पाश्चात्य देशांचा त्यांच्या अणु कार्यक्रमाला विरोध आहे. त्यामुळे उर्वरित जगामध्ये इराणची तयार होत असलेली प्रतिमा आणि जगाशी असलेले संबंध यामध्ये वास्तववादी धोरण स्वीकारण्याचे आश्वासन रोहानी यांनी मतदारांना दिले आणि आपण अणुशक्तीचा वापर केवळ शांततामय कार्यासाठीच करू, असे आपण जगाला पटवून देऊ असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या धोरणाला इराणच्या मतदारांनी जोरकस पाठींबा दिलेला आहे.