
सुमारे दहा वर्षापूर्वी ‘रिफ्यूजी’ या सिनेमातून अभिषेक बच्चन आणि करीना कपूरने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. त्या नंतर २००३ मध्ये निर्माता सूरज बड़जात्याच्या ‘मै प्रेम की दीवानी हूं’ या सिनेमातून एकत्रित झळकले होते. त्यानंतर मात्र अभिषेक आणि करीनाने एक काम केले नाही. उमेश शुक्लाच्या ‘मेरे अपने’ या सिनेमात ऋषि कपूर, अभिषेकच्या वडिलाची भूमिका करणार आहेत. सिनेमाची शूटिंग हिमाचल प्रदेश, सिक्किम आणि लंडनमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.