
सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याची संधी मिळत असेल तर कोणतीही अभिनेत्री ती हातची जाऊ देणार नाही. भूमिका भलेही छोटी का असेना रजनीसोबत
काम करण्यात अनेकजण एका पायावर त्या तयार होतील. त्यासाठी अन्य महत्त्वाची कामे मागे ठेवण्याची व प्रसंगी तारखांची जुळवाजुळव करण्याचीही त्यांची तयारी असते. रजनीसोबत काम करण्यास सगळ्य़ाच नट्या अशा उतावीळ असताना दीपिकाने मात्र थेट त्याला वेटिंगवर ठेवण्याची हिम्मत दाखविली व तेही फारसे मोठे कारण नसताना. रजनीकांतच्या आगामी ‘कोचड्डियान’ या तामीळ चित्रपटात दीपिका काम करीत आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीच सवार्ंत मोठा अडथळा ठरली आहे. तिच्यामुळे या चित्रपटाचे काम खोळबून राहिल्याने तो पडद्यावर येण्यास विलंब होत आहे. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट प्रदर्शित होताच दीपिका आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीसाठी विदेशात गेली आहे. सुट्टीहून परतल्यानंतर ती लगेच ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘रामलीला’ या आपल्या चित्रपटांच्या चित्रिकरणामध्ये सहभागी होणार अहे.
