मदुर्वायच्या सुयशने केलं मफादर्स डेयचं सेलिब्रेशन

राजकारणाच्या रणांगणात एका निरागस मुलीचं आयुष्य कसं भरडलं जातं, याचं वास्तववादी चित्रण असलेली स्टार प्रवाह वरची मदुर्वाय ही मालिका पे्रक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मदशमी क्रिएशन्सय निर्मित मदुर्वाय स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता प्रसारीत केली जाते. या मालिकेत सत्तेच्या लालसेपायी लोक आपल्या प्रियजनांचा कसा वापर करतात याची कथा रेखाटण्यात आली असून दोन राजकीय वर्तुळातील विरोधी कुटंबे यांच्यावर आधारीत मदुर्वायची कथा आहे. मदुर्वाय मालिकेत अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत विनय आपटे असून त्यांच्या मुलाची, भूपतीची भूमिका युवा अभिनेता सुयश टिळक याने साकारली आहे. रविवार 16 जूनला असणा-या जागतिक मफादर्स डेेय निमित्त या कार्यक्रमातील मुख्य अभिनेता सुयश टिळकने आपले रिअल लाइफ मधील वडील विश्‍वजीत टिळक आणि मालिकेतील वडील विनय आपटे या दोघांसोबत मफादर्स डेेयचे धम्माल सेलिब्रेशन केले. मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर अशाप्रकारे अनोखं सेलिब्रेशन करता आल्याने सगळयासाठीच हा संस्मरणीय अनुभव होता. सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वा. स्टार प्रवाहवर दाखविण्यात येणारी मदुर्वाय ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

Leave a Comment