पुण्यासह सात शहरात ऑफिसची पाच कोटी चौरस फुट जागा पडून

पुणे,दि. १ ५ देशभरात पाच कोटी चौरस फुट जागा कार्यालयीन वापरासाठी उपलब्ध असून मागणी मात्र वर्षाला तीन कोटी चौरस फुट इतकिच आहे असा अहवाल जोन्स लांग लासा ल या रिअल इ स्टेट क्षेत्रातील सल्लासेवा कंपनीने दिला आहे. देशातील सात महानगरे या अभ्यासासा ठी घेण्यात आली होती त्यात पुणे, बंगलोर, हैदराबाद समावेश आहे. सध्या रिअल इ स्टेट खाली देशात १ ० ला ख कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. त्यातील ७ ६ टक्के निवासी वापरासाठी आहेत तर उर्वरित व्यापारी स्वरुपाची आहेत. व्यापारी स्वरूपाच्या जागेत ७ ८ टक्के कार्यालये वापराची कामे सुरु असून उरलेली रिटेल क्षेत्राची आहेत.

जोन्स लांग लासा लच्या अनुज पुरी यांच्या मते बहुतेक मोकळ्या जागा चुकीच्या शहरात पडून आहेत तर काही शहरे अचूक मात्र भौगोलिक स्थान चुकीचे या स्वरूपाच्या आहेत. अशा ठिकाणी कर्मचारी ये जा करण्यास नाखुश असतात. कार्यालयासाठी जागेची ५ ५ टक्के मागणी ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांची आहे ज्या चुकीच्या शहरात ऑफिस स्पेस पडू न आहे त्यात नागपूर, नाशिक भोपाळचा समावेश आहे या शहरात आयटी उद्योग नव्याने येतील अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही असे अहवालात म्हटले आहे. पुण्याचा भांडवली खर्च इतर शहरांच्या तुलनेत ४ ३ टक्के वाढला आहे

Leave a Comment