इराण अध्यक्षपदासाठी आज मतदान

तेहरान दि.१४ – इराण मध्ये अध्यक्षपदासाठी शुक्रवारी म्हणजे आज मतदान होत असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. देशाने राबविलेल्या अणु कार्यक्रमांमुळे पाश्चमात्य देशांशी इराणचे संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत अध्यक्षपदाच्या निवड्णुकीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याचे अध्यक्ष अहमदीनेजाद यांनी आठ वर्षे सत्ता भोगल्यानंतर या निवडणुका होत आहेत.

सहा उमेदवारांपैकी पाच कॉन्झव्हेटिव्ह असून ते इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खेमनेई यांना जवळचे मानले जातात. ५० लाख इराणी मतदार या पदासाठी मतदान करणार आहेत. अध्यक्षपदासाठी आलेल्या ६०० अर्जातून केवळ आठ अर्ज मंजूर केले गेले होते व त्यातील दोन जणांनी माघार घेतली असल्याचे सांगितले जात आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार हा इराण मध्ये जन्मलेला आणि इराणी नागरिक असणे कायद्याने बंधनकारक असून महिला उमेदवार या पदासाठी निवडणूक लढवू शकत नाहीत.

अध्यंक्षपदाच्या उमेदवारांत माजी अणु निगोशिएटर हसन रोवहानी, तेहरानचे महापौर मोहम्मद बाघेर कालिबाफ, माजी परराष्ट्र मंत्री अली अकबर वेलेटी, रिव्होल्यूशन गार्ड कमांडर मोहसीन रेझी, टॉप न्यूक्लीअर निगोशिएटर सईद जलीली आणि माजी संदेश दळणवळण मंत्री मोहम्मद गराझी यांचा समावेश आहे.

Leave a Comment